महाराष्ट्रातील प्रमुख शहरे | Top 14 Major cities in Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे | Major cities in Maharashtra in Marathi

1. मुंबई

महाराष्ट्राची राजधानी. सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार बृहन्मुंबई विस्तारित नागरी संकुलाची लोकसंख्या २ कोटी ०७ लाख ४८ हजार ३९५ असून बृहन्मुंबई नागरी संकुलाची लोकसंख्या १ कोटी ८४ लाख १४ हजार २८८ इतकी तर बृहन्मुंबई शहराची लोकसंख्या १ कोटी २४ लाख ७८ हजार ४४७ इतकी आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार ‘बृहन्मुंबई विस्तारित नागरी संकुल’ हे लोकसंख्येचा विचार करता दिल्ली विस्तारित नागरी संकुलानंतरचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल असून देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर व नागरी संकुल आहे. बृहन्मुंबई शहर हे देशातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले शहर आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिशय महत्त्वाचे बंदर. भारतातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र, कापडगिरण्या, सूतगिरण्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इंजिनिअरिंग उत्पादने यांचे कारखाने. भारताची व्यापारी राजधानी. भारताचा व्यापार प्रामुख्याने (जवळजवळ २५ टक्के) मुंबई बंदरातूनच चालतो.

तुर्भे येथे तेलशुद्धीकरण कारखाने. मुंबई हाय (मुंबईपासून १६० कि. मी.) येथे समुद्रातून ‘सागरसम्राट’ व अन्य जहाजांच्या साहाय्याने खोदाई करून खनिज तेल मिळविले जाते. जुहूचा किनारा, गेट वे ऑफ इंडिया, राणीचा बाग (जिजामाता बाग), तारापोरवाला मत्स्यालय, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हँगिंग गार्डन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे. तसेच मंत्रालय, विधानभवन, सहार व सांताक्रूझ विमानतळ. ‘चले जाव’ आंदोलनामुळे ऐतिहासिक स्थान लाभलेले ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ (गवालिया टैंक मैदान) येथेच आहे. मुंबईपासून जवळच परंतु रायगड जिल्ह्यात घारापुरी येथे एलेफंटा केव्हर्ट्ज (गुंफा).

2. नागपूर

भारताचे मध्यवर्ती ठिकाण. लोकसंख्येचा विचार करता राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे तर देशातील तेराव्या क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल. लोकसंख्या २५,८३,९११ (जनगणना २०११ प्राथमिक निष्कर्ष), केवळ नागपूर शहराची लोकसंख्या २४,०५,४२१ (जनगणना २०११ प्राथमिक निष्कर्ष).
नाग नदीच्या काठी वसले आहे. नागपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. महाराष्ट्राची उपराजधानी. विधानसभा व विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. उच्च न्यायालयाचे खंडपीठ. सीताबर्डीचा किल्ला.

कापडगिरण्या, हातमाग. औद्योगिक उत्पादने. विमानतळ. संत्र्यांचे उत्पादन.

जवळच रामटेक व सावनेर येथे मँगनीजच्या खाणी. कामठी व उमरेड येथे दगडी कोळशाचे उत्पादन. तसेच रामटेक येथे ‘कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ’ साकार झाले आहे.

3. पुणे

लोकसंख्येचा विचार करता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे तर देशातील आठव्या क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल. लोकसंख्या ५०,४९,९६८ (जनगणना २०११ प्राथमिक निष्कर्ष). फक्त पुणे शहराची लोकसंख्या ३१,१५,४३१ (जनगणना २०११ प्राथमिक निष्कर्ष).
विद्येचे माहेरघर. ऐतिहासिक शहर. पेशव्यांची राजधानी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे लष्करी केंद्र. महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. राज्य शिक्षणशास्त्र संस्था. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र. आकाशवाणी केंद्र. दूरचित्रवाणी प्रक्षेपण केंद्र. बालचित्रवाणी. औद्योगिक केंद्र इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रॉनिक उत्पादने; हातकागद कारखाना- हा कागद निर्यातही होतो; पिंपरी-चिंचवड, भोसरी, हडपसर, गुलटेकडी येथे औद्योगिक वसाहती. थेरगाव येथे कागदगिरणी. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन व बाजारपेठ. लोहगाव येथे विमानतळ. जवळच कात्रज येथे सर्पोद्यान, बालेवाडी येथे अत्याधुनिक क्रीडासंकुल; त्यामुळे ‘क्रीडानगरी’ म्हणूनही पुण्यास महत्त्व प्राप्त होत आहे.

4. नाशिक

लोकसंख्येचा विचार करता राज्यातील चौथ्या क्रमांकाचे तर देशातील एकोणतिसाव्या क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल. लोकसंख्या १५,६२,७६९ (जनगणना २०११ प्राथमिक निष्कर्ष). फक्त नाशिक शहराची लोकसंख्या ११,५२,३२६ (जनगणना २०११ प्राथमिक निष्कर्ष). गोदावरी नदीकाठी. हिंदूचे तीर्थक्षेत्र. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्य ठिकाण. जवळच ओझर येथे मिग विमानांचा कारखाना. अंबड व सातपूर येथे औद्योगिक वसाहती. देवळाली येथे लष्करी छावणी. भारत सरकारचे प्रतिभूती मुद्रणालय (सिक्युरिटी प्रेस). जवळच गंगापूर येथे पहिले मातीचे धरण. द्राक्षे प्रसिद्ध.

5. औरंगाबाद

लोकसंख्येचा विचार करता देशातील त्रेचाळिसाव्या क्रमांकाचे विस्तारित नागरी संकुल. लोकसंख्या ११ लाख ८९ हजार ३७६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण. औरंगाबाद जिल्हा व औरंगाबाद विभागाचे मुख्य ठिकाण. उच्च न्यायालयाचे खंडपीठ. बिबी का मकबरा, पाणचक्की वगैरे प्रेक्षणीय स्थळे, जवळच अजिंठा-वेरूळ येथील लेणी व दौलताबादचा किल्ला. एच. एम. टी. प्रकल्प. डिझेल इंजिनांचे उत्पादन. हिमरू शाली व सिल्क प्रसिद्ध. शहरालगतच चिखलठाणा येथे विमानतळ, वाळुंज, चिखलठाणा व चितेगाव येथे औद्योगिक वसाहती. या शहरास मराठवाड्याचे हृदय म्हणून यथार्थतेने गौरविले जाते.

6. सोलापूर

जिल्ह्याचे ठिकाण. सुती कापडाच्या गिरण्या, राज्याच्या सीमेवरील औद्योगिक शहर. ऐतिहासिक भुईकोट किल्ला व सिद्धेश्वर मंदिर. येथील चादरी प्रसिद्ध. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मुख्य ठिकाण.

7. कोल्हापूर

ऐतिहासिक शहर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी. शिवाजी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण, औद्योगिक केंद्र. ‘शाहूपुरी’ ही गुळाची बाजारपेठ. कुस्ती या क्रीडाक्षेत्रातील महाराष्ट्राचे मुख्य केंद्र. महालक्ष्मी मंदिर व राजवाडा. महाराष्ट्रातील चित्रपट-व्यवसायाचे केंद्र. येथे चित्रनगरी विकसित झाली आहे. विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

8. अमरावती

कापसाची मोठी बाजारपेठ. विदर्भातील शैक्षणिक केंद्र. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्य ठिकाण, हस्तकला, कापडगिरण्या, हातमाग व यंत्रमाग. विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्य ठिकाण. संत गाडगेमहाराजांची समाधी. कुष्ठरोग्यांसाठी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेले ‘तपोवन-जगदंबा कुष्ठधाम’ येथेच आहे.

9. नांदेड

गोदावरी नदीकाठी. शिखांचे दहावे गुरू-गुरू गोविंदसिंगजी यांची समाधी. नव्यानेच स्थापन झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण.

10. पैठण

नव्याने विकसित होत असलेले औद्योगिक केंद्र. ‘दक्षिणेची काशी’ म्हणून ओळखले जाते. संत एकनाथांची समाधी. प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र. सातवाहनांची राजधानी. गोदावरीकाठचे तीर्थक्षेत्र. जायकवाडी प्रकल्पातील नाथसागर जलाशय. वृंदावन गार्डन- मैसुरूच्या धर्तीवर उभारण्यात आलेले ज्ञानेश्वर उद्यान, संत विद्यापीठ साकार होत आहे.

11. चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्याचे ठिकाण, जवळच बल्लारपूर येथे कागद कारखाना व लाकूड बाजार. औष्णिक विद्युत्निर्मिती केंद्र. मैंगनीज | शुद्धीकरण कारखाना. जवळच ताडोबाचे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान.

12. वर्धा

वर्धा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय, जवळच गांधीजींच्या वास्तव्याने पुनीत झालेले सेवाग्राम (पूर्वीचे शेगाव) व पवनार येथील विनोबाजींचा परमधाम आश्रम. ‘अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ’ ही संस्था येथेच आहे. जवळच दत्तपूर येथे कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठधाम. सेवाभावी संस्थांचे माहेरघर.

13. सांगली

सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. कृष्णेच्या काठी. हळद, गूळ, शेंगा यांची बाजारपेठ. गावात मध्यभागी गणेशदुर्ग नावाचा किल्ला. आकाशवाणी केंद्र व औद्योगिक वसाहत. सहकारी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र.

14. लातूर

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. औद्योगिकदृष्ट्या व शैक्षणिक-दृष्ट्या विकसनशील, हजरत सूरतशाहवली दर्गा. केशवराज मंदिर व सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध.

तर विद्यार्थी मित्रांनो ही आहेत महाराष्ट्रातील प्रमुख 14 शहरे. तुम्हाला या लेखात दिलेल्या माहितीबद्दल काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा

 

नमस्कार! मी रोहित म्हात्रे. सामान्य ज्ञान विषय शिकवण्याचा मला विशेष अनुभव आहे. कठीण गोष्टी सहजतेने समजावणे हेच माझं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हेच माझं ध्येय आहे.

Leave a Comment