जगाचे नैसर्गिक विभाग | Natural divisions of the world in Marathi
टुंड्रा प्रदेश | Tundra region
हा प्रदेश शीत कटिबंधात येत असून याचा विस्तार ६०० उत्तर ते ८०° उत्तर अक्षवृत्तांदरम्यान आढळून येतो; दक्षिण गोलार्धात असा प्रदेश नाही. हिवाळ्यात येथील किमान तापमान (-) ४०० सें. ग्रे. तर उन्हाळ्यात कमाल तापमान १०० सें. ग्रे. इतके असते; तर पाऊस २५ सें. मी. हिमवर्षावाच्या स्वरूपात आढळून येतो. ग्रीनलंड, कॅनडाचा उत्तर भाग, फिनलंड, सैबेरियाचा उत्तर भाग इत्यादी भाग या प्रदेशात मोडतो. या प्रदेशात एस्किमो, लॅप व सॅमॉईड हे लोक राहतात. सीलव वालरस यांसारखे जलचर, पेंग्विन पक्षी व पांढरी अस्वले याच प्रदेशात आढळतात. फक्त उन्हाळ्यात शेवाळे, नेचे यांसारख्या वनस्पती उगवतात.
सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
हा प्रदेश समशीतोष्ण कटिबंधात येत असून याचा विस्तार ५०० उत्तर ते ६६.५° उत्तर अक्षवृत्तांदरम्यान आढळून येतो; दक्षिण गोलार्धात असा प्रदेश नाही. मध्य कॅनडा, रशियाचा उत्तर भाग व सैबेरियाचा काही भाग या प्रदेशात मोडतो. येथील तापमान किमान (-) ४०० सें. ग्रे. तर कंमाल २१० सें. ग्रॅ. इतके असते. फर, पाईन, स्यूस, लार्च, हेमलॉक यांसारखे सूचिपर्णी वृक्ष या प्रदेशात आढळून येत असून हे वृक्ष बुंध्याशी जाड व टोकाशी निमुळते असतात; पाने सुईप्रमाणे निमुळती; फळे ही शंक्वाकृती आढळतात. एल्क, कॅरिबू, सिल्व्हर फॉक्स, वीझल, बीव्हर यांसारखे प्राणी या प्रदेशात आढळतात.
पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश
हा प्रदेश दोन्ही गोलार्धात ४५० ते ६०० अक्षवृत्तांपर्यंत विस्तारलेला असून तो समशीतोष्ण कटिबंधात येतो. येथील वार्षिक पर्जन्यमान १५० सें. मी. इतके असून मुख्यत्वे हिवाळ्यात पाऊस पडतो. हा पानझडी वृक्षांचा प्रदेश असून बीच, ओक, पापलर, एल्म यांसारखे वृक्ष या प्रदेशात आढळतात. ब्रिटन, उत्तर व पश्चिम युरोप, कॅनडाचा पश्चिम भाग, न्यूझीलंड वगैरे प्रदेश या विभागात येतात. हा विभाग औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून गाई, मेंढ्या, डुकरे यांसारखे पाळीव प्राणी व सधन शेतीमुळे भरभराटीस आलेला आहे.
गवताळ (प्रेअरीज) प्रदेश
हा प्रदेश दोन्ही गोलार्धात ३०० ते ५५० अक्षवृत्तांपर्यंत विस्तारलेला असून तो समशीतोष्ण कटिबंधात येतो. या प्रदेशात उन्हाळ्यात ५० सें. मी. इतका पाऊस पडतो तर येथील तापमान किमान (-) ८० सें. ग्रे. व कमाल १९० सें. ग्रे. इतके आढळून येते. या प्रदेशास निरनिराळ्या भू-भागांत निरनिराळी नावे आहेत. उत्तर अमेरिकेत या प्रदेशास ‘प्रेअरीज’ म्हणून ओळखतात. दक्षिण अमेरिकेत या प्रदेशास ‘पम्पास’ असे म्हटले जाते, तर युरेशियात ‘स्टेप्स’, ऑस्ट्रेलियात ‘डाऊन्स’ व आफ्रिकेत ‘व्हेल्ड’ असे संबोधले जाते. या प्रदेशात गवताची विस्तीर्ण कुरणे आढळून येतात; मात्र वृक्षांचे प्रमाण तुरळक दिसून येते. स्टेप्सच्या गवताळ प्रदेशात किरगीझ लोक राहतात; त्यांच्या तंबूच्या घरास ‘यूर्ट’ असे म्हणतात. या प्रदेशात गव्हाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात आढळून येते. ‘कुमीस’ हे या प्रदेशातील लोकांचे आवडते पेय होय.
भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश
दोन्ही गोलार्धात ३०० ते ४०० अक्षवृत्तांच्या दरम्यान या प्रदेशाचा विस्तार असून तो समशीतोष्ण कटिबंधातील उबदार पट्टचात येतो. येथे सौम्य हिवाळा, पश्चिमी वारे, मध्यम पर्जन्य इत्यादी वैशिष्ट्ये आढळून येतात. भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश, कॅलिफोर्निया, मध्य चिली वगैरे भाग या विभागात मोडतो. ओक व बर्च यांसारखी वृक्ष या प्रदेशात आढळून येत असून येथील वृक्ष कमी उंचीचे असतात. ‘ऑलिव्ह’ सारखी आंबट गोड फळे येथे आढळून येतात व गहू, जव, मका ही धान्ये घेतली जातात.
वाळवंटी प्रदेश
वाळवंटी प्रदेश यास ‘सहारा प्रकार’ असेही म्हणतात. दोन्ही गोलार्धात २०० ते ३०० अक्षवृत्तांच्या दरम्यान हा प्रदेश विस्तारलेला असून येथील ताप, किमान १०० सें. ग्रे. व कमाल २९० सें. ग्रे. इतके आढळून येते. या प्रदेशात दिवसा अतिशय तप्त तर रात्री अतिशय थंड प्रकारचे हवामान पाहावयास मिळते. येथील पर्जन्याचे प्रमाण १० ते १२ सें. मी. इतके असते. दक्षिण अमेरिकेतील अटाकामा, आफ्रिकेतील सहारा व कलहारी, उत्तर अमेरिकेतील कोलोरॅडो, अरबस्तान, मध्य आशियातील गोबी व भारतातील थर ही वाळवंटे या प्रदेशात मोडतात. या प्रदेशात निवडुंग, बाभूळ यांसारखी काटेरी झुडपे व खुरटे गवत आढळून येते. खजूर हे येथील मुख्य पीक म्हणून घेतले जाते. उंट हा येथील महत्त्वाचा व उपयुक्त प्राणी आहे. सहारा व अरबस्तानात ‘बदाऊन’ हे भटके लोक राहतात.
सुदानी प्रदेश
सुदानी प्रदेश हा प्रदेश दोन्ही गोलार्धात ५० ते १५० अक्षवृत्तां-दरम्यान विस्तारलेला असून तो उष्ण कटिबंधात येतो. मुख्यत्वे आफ्रिकेतील सुदान, पश्चिम युगांडा व पश्चिम टांझानिया हा भाग या प्रदेशात येतो. उन्हाळ्यात येथे ७५ सें. मी. पर्यंत पाऊस पडतो. या प्रदेशात रुंद खोडाचे व छत्रीच्या आकाराचे वृक्ष; दोन ते सहा मीटर इतक्या उंचीचे गवत; गवतावर उपजीविका करणारे झेब्रा, जिराफ, रानबैल, पाणघोडे, गेंडे, हत्ती वगैरे प्राणी; त्याचबरोबर अशा प्राण्यांवर उपजीविका करणारे सिंह, वाघ, तरस यांच्यासारखी हिंस्र श्वापदे आढळून येतात. या प्रदेशात ‘झुलू’ व ‘मसाई’ हे आफ्रिकन वंशाचे लोक राहतात.
मोसमी हवामानाचा प्रदेश
उष्ण कटिबंधात मोडणारा हा प्रदेश दोन्ही गोलार्धात ५० ते ३०० अक्षवृत्तांदरम्यान विस्तारलेला असून आग्नेय व दक्षिण आशियाचा काही भाग व भारताचा मोठा भाग याच प्रदेशात येतो. या प्रदेशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन ऋतू दिसून येतात. येथे हिवाळा कोरडा व सौम्य प्रकारचा आढळून येतो. येथे पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. येथील पाऊस मोसमी वाऱ्यांपासून मिळत असून तो अनिश्चित स्वरूपाचा असतो. येथे किनारपट्टीत खूप तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात अतिशय कमी पाऊस आढळून येतो. हा रूंदपर्णी व पानझडी वृक्षांचा प्रदेश असून येथे साग, साल, ऐन व खैर यांसारखे वृक्ष आढळून येतात.
विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचा प्रदेश
विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचा प्रदेश हा प्रदेश ५० उत्तर ते ५० दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान विस्तारलेला आहे. येथे वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू आढळून येतो. येथील वार्षिक पर्जन्यमान २०० सें. मी. इतके असते. येथे सूर्यकिरण वर्षभर सरळ रेषेत पडत असल्याने येथील तापमान तीव्र व हवा ढगाळ आढळून येते. घनदाट अरण्यांमुळे या प्रदेशात सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नसल्याने वृक्ष उंच वाढतात. रबर, आंबा, महोगनी, सिंकोना, बांबू यांसारखे वृक्ष येथे पाहावयास मिळतात. या प्रदेशात नद्या, दलदल व रोगराईचे प्रचंड प्रमाण आढळून येते. अनेक प्रकारचे सर्प, विविध पक्षी, माकडे, रानडुकरे यांसारखे प्राणिजीवन येथे पहावयास मिळते. ‘गोरीला’ हे माणसासारखे परंतु अजस्र माकड याच प्रदेशात आढळते. कांगो व अॅमेझॉन खोरे याच प्रदेशात येतात. कांगोच्या खोऱ्यात ‘पिग्मी’ नावाचे लोक राहतात. रोगट हवामानामुळे हे लोक कृश व बुटके आहेत. त्यांची आयुर्मर्यादा अतिशय कमी आहे.
तर मित्रांनो मला अशा आहे जगाचे नैसर्गिक विभाग या लेखातून तुम्हाला Natural divisions of the world in Marathi समजायला मदत झाली असेल, तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.
Also Read