प्राचीन आणि अर्वाचीन भारतीय शास्त्रज्ञ | Indian Scientists Names In Marathi

प्राचीन आणि अर्वाचीन भारतीय शास्त्रज्ञ | Indian Scientists Names In Marathi

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ

आर्यभट्ट पहिला

इसवी सनाच्या पाचव्या शतकात भारतात होऊन गेलेला बोर खगोलशास्त्रज्ञ व गणिती. याचे जन्मवर्ष इ. स. ४७६ मानले जाते. ‘भारतीय खगोलशास्त्राचा जनक मानला गेलेला हा बोर शास्वज्ञ ‘आर्यभट्टीय’ या खगोलशास्वावरील सुप्रसिद्ध पंचामुळे अजरामर झाला आहे. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीही फिरते, हे यांनी प्रतिपादन केले.

वराहमिहीर

खगोल, गणित व फलज्योतिष या तीनही शास्त्रावर प्रभुत्व असलेला हा थोर शास्त्रज्ञ सम्राट विक्रमादित्याच्या नवरत्नापैकी एक गणला जातो. याचे जन्मवर्ष इ. स. ४९० हे मानले जाते. ‘पंचसिद्धान्तिका’, ‘बृहन्मातक’, ‘वाराहीसहिता’ हे याचे सुप्रसिद्ध ग्रंथ होत. ‘वाराहीसंहिता’ या ग्रंथास “बृहत्संहिता’ म्हणूनही ओळखले जाते. ‘पंचमिद्धान्तिका’ या ग्रंथात त्याने पौलिश, रोमक, वसिष्ठ, सौर व पैतामह या ज्योतिषशास्त्रविषयक पाच महत्त्वपूर्ण सिद्धान्तांचा ऊहापोह केला आहे. ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात त्याने ग्रीक व भारतीय या दोन्ही फलज्योतिषशास्त्रांचा उत्कृष्ट समन्वय साधला असून ग्रीकांच्या बारा राशींच्या कल्पना व कुंडली मांडून भविष्य सांगण्याची रीत यांचा भारतास परिचय करून दिला.

ब्रह्मगुप्त

इ. स. ५९८-६६५ हा याचा काळ मानला जाती. हर्षवर्धनास समकालीन असलेला हा थोर भारतीय शास्त्रज्ञ ‘ब्राहारफुटसिद्धान्त’ या ग्रंथाचा कर्ता गणला जातो. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडणाऱ्या न्यूटनचा आज मोठा गौरव केला जातो; परंतु पृथ्वींच्या ठिकाणी आकर्षणशक्ती असल्याचे ब्रह्मगुप्ताने न्यूटस्पूर्वी कित्येक शतके अगोदर प्रतिपादन केले आहे.

भास्कराचार्य

इ. स. १९१४-११७५ हा याचा काल गणला जातो. याच्यापूर्वीही भास्कराचार्य याच नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेल्याने याचा उल्लेख दुसरा भास्कराचार्य असा करणे श्रेयस्कर. “सिद्धान्तशिरोमणी’ हा याचा महत्वपूर्ण ग्रंथ होय. याचा ‘लीलावती हा ग्रंथ जगप्रसिद्ध असून तो सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाचाच एक भाग वा प्रकरण गणले जाते. यामध्ये एकवर्ण समीकरणे, अनेकवर्ण समीकरणे, वर्ग-वर्गमूळ, घन घनमूळ, व्यवहारी अपूर्णांक, त्रिकोणाचे क्षेत्रफळ इत्यादींचे सुंदर विवेचन काव्यमय भाषेत केलेले आहे. शून्यलब्धी च्या तत्त्वाचा शोध ही याची महत्वपूर्ण कामगिरी होय.

कणाद

पुढे कित्येक शतकांनंतर डाल्टनने मांडलेली व आधुनिक विज्ञानाने डोक्यावर घेतलेली ‘परमाणु’ कल्पना मांडणारा बोर भारतीय शास्त्रज्ञ. ‘वैशेषिकदर्शन’ हा याचा सुप्रसिद्ध प्रथ होय. विश्वाची निर्मिती परमाणूंपासूनच झाली असून सर्व पदार्थाचे मूळ परमाणूतच आहे, असे याने प्रतिपादन केले,

नागार्जुन

इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या या बोर भारतीय शास्त्रज्ञास ‘भारतीय रसायनशास्त्राचा जनक’ असे महठत्यास ते वावगे ठरणार नाही. ‘सिद्धनागार्जुन’ हा बाचा रसायन-शास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ होय, रसायनशास्त्रावर महत्त्वपूर्ण संशोधन करणारा थोर वैद्यक म्हणूनही तो प्रसिद्ध होता.

सुश्रुत

‘सुश्रुतसंहिते’चा हा जनक इ. स. पूर्व पाचव्या शतकात होऊन गेला असे मानले जाते. सुश्श्रुतसंहितेत याने अकराशेहून अधिक रोगांची चर्चा केली असून त्यांची लक्षणे दिली आहेत व त्यांवरील उपायही सांगितले आहेत. आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे मोतीबिंदु, हर्निया इतकेच नव्हे, तर सध्या प्रचलित असलेल्या सिझरीन यांसारख्या शस्त्रक्रियांची व त्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची माहितीही त्याच्या ग्रंथात आढळते.

चरक

वैद्यकशास्वावरील जगप्रसिद्ध ‘चरकसंहिता’ या ग्रंथाचा जनक. याने लिहिलेल्या चरकसंहितेत गर्भधारणा, गर्भाची वाढ, त्यात होणारे शारीरिक बदल, अवयवांची निर्मिती आणि त्यांचे कार्य या विषयांची माहिती आहे. हा सम्राट कनिष्काचा दरबारी वैद्य होता.

अर्वाचीन भारतीय शास्त्रज्ञ

एस. पी. आधारकर

महाराष्ट्रीय वनस्पतीशास्त्रज्ञ. ‘पपई’ आणि ‘केळी’ या फळांवर त्यानी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. पश्चिम घाटातील अनेकविध वनस्पती व काश्मीरमधील कीटक यांवरही त्यांनी माहत्वपूर्ण संशोधन केले आहे. पुणेस्थित ‘महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी’ या संस्थेच्या स्थापनेचे श्रेय त्यांनाच दिले जाते. त्यांच्या नावाने ओळखली जाणारी ‘आधारकर रिसर्च इन्टिट्यूट, पुणे’ ही स्वायत्त वैज्ञानिक संशोधन संस्था विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे

सी. व्ही. रामन

CV Raman
CV Raman

‘रामन इफेक्ट्स’ या नावाने प्रसिद्ध असलेला संशोधनाबद्दल १९३० चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक, नोबेल पारितोषिकाचे दुसरे भारतीय मानकरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्नोसचे संचालक, इंडिस अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या स्थापनेत पुढाकार, इंडियन अर्केडमी ऑफ सायन्सच्या परिषदेचे १९४४ व १९४९ असे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले. इ. स. १९४८ मध्ये रामन रिसर्च सेंटरची स्थापना. इ. स. १९५४ मध्ये भारतरत्न सन्मान, रशियाच्या लेनिन पारितोषिकाचे मानकरी.

डॉ. होमी भाभा

भारताच्या अणुविज्ञानाचे जनक, अवकाश किरण व कणसिद्धान्तावर संशोधन, भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष, अणुशक्ती संशोधन केंद्राचे जनक, तुर्भे (ट्रॉम्बे) येशील अणुसंशोधन केंद्रास यांचेच नाव देण्यात आले आहे. इ. स. १९५५ मध्ये जीनिव्हा येथे भरलेल्या ‘शांततेसाठी अणुशक्ती’ या विषयावरील परिषदेचे अध्यक्षपद डॉ. भाभांना देण्यात येऊन त्यांचा यथोचित गौरव केला गेला. इ. स. १९६४ मध्ये पद्मभूषण सन्मानाने गौरव, त्याच वर्षी मेघनाद साहा सुवर्णपदक मिळाले. “अरिक्ष किरण’ व ‘क्वांटम सिद्धान्त’ हे त्यांचे प्रबंध प्रसिद्ध आहेत. इ. स. १९६६ मध्ये विमान अपघातात मृत्यू.

जगदीशचंद्र बोस

बिनतारी संदेशवहन या क्षेत्रात संशोधन, वनस्पतींनाही भावना व संवेदना असतात, हे सिद्ध केले. प्रकाश, आवाज, स्पर्श व बीज यांना वनस्पती प्रतिसाद देतात, असे त्यांनी दाखवून दिले. वनस्पती व प्राणी यांच्या चेतासंस्थांमध्ये निश्चित अशी सीमारेषा नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. जीवनसत्त्वे, अल्कोहोल व विष यांचा मानवावर जसा परिणाम होतो, तसाच तो वनस्पती-बरही होती हे त्यानी दाखवून दिले. त्यांनी तयार केलेल्या ‘केस्कोगफ या उपकरणाच्या आधारे बनस्पतीच्या वाढीच्या गतीची तसेच हालचालींची नोंद घेता येते. इ. स. १९१७ मध्ये त्यांनी कोलकात्यास ‘बोस रिसर्च इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली होती.

डॉ. राजा रामण्णा

भारताच्या अणुतंत्रज्ञान विकासाच्या कार्यक्रमातील डॉ. भामा वांचे सहकारी. इ. स. १९७४ च्या पोखरण अणुस्फोटामागील सूत्रधार भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून काम. काही काळ अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष होते. वैज्ञानिक क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल जून, १९८६ मध्ये बिर्ता पुरस्कार. सन २००४ मध्ये निधन.

डॉ. जयंत नारळीकर

फ्राईड हॉईले यांच्या समवेत स्थिर विश्वाचा ‘हईिल नारळीकर’ सिद्धान्त मांडला. पुणेस्थित आयुका (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स IICAA) या संस्थेचे सोथापक. सन २००४ च्या प्रजासत्ताकदिनी पद्‌मविभूषण पुरस्कार प्रदान केला गेला. सन २०१० च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी, ‘आकाशाशी जडले नाते’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

प्रा. सतीश धवन

satish dhawan
satish dhawan

पट्द्मविभूषण १९८१. काही काळ अवकाश आयोग क अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. ते ‘रोहिणी’ व ‘अॅपल’ बांच्या उल्यामागील प्रमुख सूत्रधार होत, अॅस्ट्रॉनॉटिक्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आर्यभट्ट पुरस्काराचे १९९२ चे मानकरी, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) येथील उपग्रह प्रक्षेपक केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

डॉ. यू. आर. राव

काही काळ अवकाश आयोगाचे व भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इखो) अध्यक्षपद भूषविले. वैश्विक किरणांबाबत महत्वपूर्ण संशोधन, भारताचा उपग्रह कार्यक्रम प्रामुख्याने याच्याच मार्गदर्शनाखाली राबविला गेला, प‌द्मभूषण सन्मानाचे मानकरी, अॅस्ट्रॉनॉटिक्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आर्यभट्ट पुरस्काराचे १९९३ चे मानकरी इ. स. १९९६ च्या आंतरराष्ट्रीय विक्रम साराभाई पुरस्काराचे मानकरी.

प्रा. एम. जी. के. मेनन

पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार म्हणून काही काळ काम. नियोजन मंडळाचे सभासद शास्त्रज्ञ यांच्याच अध्यक्षते खाली इ. स. १९७१ मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स कमिशन’ची स्थापना केली गेली. काही काळ भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्षपद भूषविले. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, सी. यहीं, रामन पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार वा पारितोषिके,
इ. स. १९८५ मध्ये पद्मविभूषण.

डॉ. सी. एन. आर. राय

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बेंगळुरूचे संचालक, जानेवारी, १९८८ मध्ये पुण्यात भरलेल्या पंचाहत्तराव्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष मध्यवर्ती शासनाच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य, नेहरू फेलोशिपचे मानकरी. शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक व सी. व्ही. रामन पारितोषिक इ. स. १९७३ मध्ये पद्मश्री. इ. स. १९८५ मध्ये प‌द्मविभूषण. सन २०१४ मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न ‘ने गौरान्वित.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

इ. स. १९८१-९० या दशकातील भारताच्या अवकाश-प्रगतीत यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ‘पृथ्वी’, ‘त्रिशूल’, ‘अग्नी’ च्या यशाचे प्रमुख शिल्पकार ‘विज्ञानश्री’ पारितोषिकाचे मानकरी. पद्म‌विभूषण सन्मानाचे १९६० चे मानकरी, १९९७चा राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार. काही काळ संरक्षण खात्याचे व नंतर पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार तद्नंतर केंद्र शासनाचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार. १ मार्च, १९९८ रोजी ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान, या मिसाईल मैन ऑफ इंडियाने २५ जुलै, २००२ ते २५ जुलै, २००७ या कालावधीत भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून आपल्या कारकिर्दीचा चांगलाच ठसा उमटविला आहे. ‘भारतरत्न’ सन्मान मिळाल्यानंतर राष्ट्रपतिपद भूषविणारी ती दुसरी व्यक्ती होत. मेघालयमधील शिलाँग येथे २७ जुलै, २०१५ रोजी निधन

डॉ. एम. एस. स्वामिनाथन

swaminathan
swaminathan

संपूर्ण नाव- मोनकोबू सांबाशिवम स्वामिनाथन भारतीय कृषिशास्त्रज्ञ. भारतात यशस्वी झालेल्या हरितक्रांतीचे शिल्पकार काही काळ मनिला येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत व्यवस्थापकीय संचालक. ३. स. १९८७ मध्ये बर्ड फूड प्राईडा’ हे पारितोषिक मिळविणारे ते पहिले भारतीय होत. सन १९९६ च्या अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड सायन्स पुरस्काराचेही ते मानकरी होत, इंदिरा गांधी शांतता पुरस्काराचे १९९९ चे मानकरी, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि बाँड रसेल यांनी स्थापन केलेल्या उथवॉश कॉन्फरन्सचे काही काळ नेतृत्व, हा मान मिळविणारे ते पहिलेच भारतीय होत. मे, २००४ पासून ते राष्ट्रीय किसान आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

व्ही. कुरियन

संपूर्ण नाव- वर्गीस जे. कुरियन भारतातील धवलक्रांती-मागील सूत्रधार, काही काळ आणद’ (गुजरात) येथील राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाचे अध्यक्ष मॅगसेसे पुरस्कार १९६३: वर्ल्ड फूड प्राईझ १९८९; ‘डेअरी पर्सन’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी १९९३. ‘पद्मविभूषण’ सन्मानाचे १९९९ चे मानकरी.

सॅम पित्रोदा

संपूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा काही काळ पंतप्रधानांचे तंत्रज्ञानविषयक सल्लागार, टेलिकॉम कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ काम. सन २००५-०८ या काळात त्यांनी राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील जागतिक संस्थेचे (World Tel) अध्यक्षपदही भूषविले आहे.

डॉ. आर. चिदंबरम

काही काळ अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, ३० नोव्हेंबर, २००० रोजी अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त. सन १९७४ व १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे यशस्वी अणुस्फोट घडविले. हे अणुस्फोट घडवून आणण्यात डॉ. चिदंबरम बांची भूमिका महत्त्वाची होती. सन १९९९ च्या पद्‌मविभूषण सन्मानाचे मानकरी.

डॉ. अनिल काकोडकर

काही काळ भामा अनुसंशोधन केंद्राचे संचालक महणून काम, ३० नोव्हेंबर, २००० पासून नोव्हेंबर २००९. अखेरपर्यंत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत. प‌द्मभूषण सन्मानाचे १९९९ चे मानकरी. अनेक आंतरराष्ट्रीय अणुविज्ञान संस्थांचे अध्यक्ष २६ जानेवारी, २००९ रोजी प‌द्मविभूषण पुरस्काराने सन्मानित.

प्रा. कृष्णणस्वामी कस्तुरीरंगन

भारताच्या अवकाश आयोगाचे अध्यक्ष काही काळ भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्षपद भूषविले. सन २००३-०९ या काळात राज्यसभा सदस्य, नियोजन आयोगाचे माजी सदस्य, सन १९८२ मध्ये पद्मश्री, सन १९९२ मध्ये प‌द्मभूषण व सन २००० मध्ये पट्द्मविभूषण, वेंकटरामन राधाकृष्णन भूळ भारतीय वंशाचे, बुनायटेड किंग्डम व अमेरिका या देशांचे नागरिकत्व. रायबोझोमची रचना व कार्य यांवरील संशोधनाबदल सन २००९ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक.

 

नमस्कार! मी रोहित म्हात्रे. सामान्य ज्ञान विषय शिकवण्याचा मला विशेष अनुभव आहे. कठीण गोष्टी सहजतेने समजावणे हेच माझं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हेच माझं ध्येय आहे.

Leave a Comment